शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Devendra Fadanvis: PM मोदी अन् CM एकनाथ शिंदे लवकरच एकत्र, फडणवीसांनी सांगितला महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 8:55 PM

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.

नागपूर/ मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करताना, शिंदे-फडणवीस सरकारची आगामी वाटचालही त्यांनी सांगितली.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.  दरम्यान, राज्यातील पूरस्थितीकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही घेतली आहे. मी स्वत: काल रायगड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सातत्याने सर्व यंत्रणांशी संपर्कात आहेत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले आहे. गेल्या अडीच वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नेमके कोण राज्य चालवत होते, तेच समजत नव्हते, अशी टीका करताना, सर्वोच्च न्यायालयात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केले असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग