चक्रधरपूर विभागात विकासकामे : मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या प्रभावित

By नरेश डोंगरे | Updated: July 9, 2024 21:15 IST2024-07-09T21:15:24+5:302024-07-09T21:15:34+5:30

अनेक गाड्या प्रभावित होणार असून काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

Development works in Chakradharpur division: Many trains affected by mega block | चक्रधरपूर विभागात विकासकामे : मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या प्रभावित

चक्रधरपूर विभागात विकासकामे : मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या प्रभावित

नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मेगा ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या प्रभावित होणार असून काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये टाटानगरहून नागपूरमार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचाही समावेश आहे. त्यात १८१०९ टाटानगर - नेताजी सुभाषचंद्र बोस (ईतवारी) तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस (ईतवारी) टाटानगर या दोन रेल्वे गाड्यांचाही समावेश आहे. या दोन्ही गाड्या १३, २० आणि २७ जुलैला धावणार नाही. त्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, सहकार्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title: Development works in Chakradharpur division: Many trains affected by mega block

टॅग्स :nagpurनागपूर