शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांतील विकासकामांची सुरुवात घरापासून

By admin | Updated: March 23, 2015 02:35 IST

पक्षकारांना वेळेवर व कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ...

नागपूर : पक्षकारांना वेळेवर व कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. याची सुरुवात घरापासून म्हणजेच नागपुरातून करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई अध्यक्षस्थानी तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवने व बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरैशी सन्माननीय अतिथी होते. याशिवाय व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे व मावळते सचिव अ‍ॅड. मनोज साबळे उपस्थित होते. पार्किंग व वकिलांच्या बसण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालयात नवीन ‘एल’ आकाराची इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याकरिता ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी व इमारतीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय जिल्हा न्यायालयाच्या पश्चिमेकडील नाल्यावर बहुमजली पार्किंग इमारत बांधणे, सुयोग इमारत पूर्णपणे जिल्हा न्यायालयाला देणे, सुयोग इमारतीपुढील मोकळ्या परिसरात पुन्हा नवीन विकासकामे करणे इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ते ३ वर्षांचा वेळ देण्याची विनंती त्यांनी केली. फडणवीस यांच्यामुळे जिल्हा वकील संघटनेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेल्याचे मत न्या. गवई यांनी व्यक्त केले. न्यायाधीश, वकील व पक्षकारांमधील दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी संघटनेने कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, न्यायाधीशांनी वकिलांवर आगपाखड केली नाही व वकील न्यायाधीशांसोबत सन्मानपूर्वक वागल्यास न्यायालयात चांगले वातावरण राहील असेही त्यांनी सांगितले. न्या. धर्माधिकारी यांनी शासनाकडून जे काही मिळेल त्याचा उपयोग संघटनेने सर्वांसाठी करावा, असे आवाहन केले तर, न्या. सोनवने यांनी न्यायाधीशांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. अ‍ॅड. राधिका बजाज व अ‍ॅड. उदय डबले यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)