शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या विकासाचा आराखडा

By admin | Updated: November 15, 2014 02:50 IST

अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील लभाण, बंजारा अशा मागास घटकांसह ....

गणेश हूड नागपूर अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील लभाण, बंजारा अशा मागास घटकांसह भटक्या जाती-जमातींच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विकास योजना राबविण्यासाठी तालुकानिहाय संख्या व प्रस्तावित योजनाबाबतचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.उदरनिर्वाहासाठी भटकंती करणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीमधील घटकांना मुख्य प्रवाहात आणून विकास योजना राबविल्या जातात. यात तांडा सुधार योजनेंतर्गत वस्त्यांचे विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालय, वाचनालय व मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते आदी कामांचा समावेश आहे. परंतु मागील काही वर्षात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने या वस्त्यांचा विकास रखडला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत तांडा सुधार योजना राबविली जाते. परंतु या विभागाकडे जिल्ह्यातील भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या वस्त्यांची माहिती वा आराखडा उपलब्ध नाही. त्यामुळे विकास योजना राबविताना अडचणी येतात. ही बाब विचारात घेता जाती, जमातीची तालुकानिहाय लोकसंख्या व वस्त्यांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.अनुसूचित जाती, जमाती आदेश(सुधारणा) कायदा १९७६ च्या भाग १० मध्ये ५९ अनूसुचित जातीचा तसेच विमुक्त जाती आरक्षण यात ३७ जमातींचा समावेश आहे. या गरजू लोकांच्या विकासासाठी हा आराखडा तयार केला जाणार आहे. यात ५० ते १०० लोकवस्तीसाठी ४ लाख, १०१ ते १५० पर्यंतच्या लोकसंख्येसाठी ६ तर त्यापुढील लोकसंख्येच्या वस्त्यांसाठी १० लाखापर्यंतचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.