शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लोक सहभागातून व्हावा भूजल विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:08 IST

भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण, पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून विविध उपाययोजनांद्वारे भूजल विकास व व्यवस्थापन आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

ठळक मुद्देसंजीव कुमार : नागरिकांकडून हरकती सूचना स्वीकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण, पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून विविध उपाययोजनांद्वारे भूजल विकास व व्यवस्थापन आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात गुरुवारी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ चे मसुदा नियमाबाबत हरकतींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांच्याद्वारे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, राज्य भूजल प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, केंद्रीय भूजल मंडळचे प्रादेशिक संचालक डॉ. प्रदीप परचुरे, प्रादेशिक उपसंचालक डॉ. प्रवीण कथने, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, वरिष्ठ भूवैज्ञानिक मंगेश चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन), अधिनियम २००९ हा कायदा चांगला असून याची अंमलबजावणी व्हायला हवी. या नियमाबाबत जनजागृती करून याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवा. या कायद्यान्वये अधिसूचित क्षेत्रात नवीन विहीर घेण्यास बंदी शिथिल करण्यात आली आहे. प्रत्येक शहरी भागात पावसाच्या पाण्याचे संकलन बंधनकारक असणार आहे. ते न केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. या मसुद्यानुसार ६० मीटरपेक्षा जास्त खोल विहिरी सिंचनाकरिता वापरायच्या नाहीत. प्रत्येक विहिरीची नोंदणी करुन प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.बोअरवेल बुजविणे बंधनकारकबरेचदा अपघाताने बोअरवेलमध्ये मुले पडण्याची घटना घडते. याची संपूर्ण जबाबदारी बोअरवेल मालकांची किंवा यंत्रधारकाची असेल. अर्धवट राहिलेले बोअरवेल बुजविणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिला.

टॅग्स :WaterपाणीEarthपृथ्वी