शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भेदभाव न करता विकास करा

By admin | Updated: March 5, 2016 03:18 IST

भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त

नागपूर : भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त यांच्यासारख्या सामान्य व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. निवडणुकीपूर्वीचे हे स्थायी समितीचे वर्ष आहे. त्यामुळे पुढील दहा महिन्यात नगरसेवकात कोणताही भेदभाव न करता राऊत यांनी शहर विकासाला पुन्हा गती द्यावी,असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी केले. महापालिका मुख्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात बंडू राऊ त यांनी मावळते अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. व्यासपीठावर उपमहापौर मुन्ना पोकुलवार, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, चित्रपट अभिनेता विलास उजवणे, विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी उपस्थित होते.राऊ त यांच्यात सर्वांचे समाधान करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षात निवडणूक असल्याने त्यांना दहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.या कालावधीत त्यांच्या नेतृत्वात समिती शहर विकासाची कामे करेल. नागपूर विकास आघाडीने शहर विकासाचे अनेक चांगले निर्णय घतले. २४ बाय ७ योजना, मालमत्ता कराची फेरआकारणी, या सोबतच विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहे. राऊ त यांच्या कार्यकाळातही विकासाची गती कायम राहील, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.राऊ त सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. त्यांना शहरातील समस्यांची जाण आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्याकडे दहा महिन्यांचाच कालावधी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबत घेऊ न ते शहराचा विकास करतील अशी अपेक्षा दयाशंकर तिवारी यांनी व्यक्तस्यायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना राऊ त यांना दक्ष राहावे लागेल. महापालिकेतील अनेक घोटाळे गाजत आहे. गेल्या आठ-दहा वर्षात ज्या कंत्राटदारांनी योग्य काम केले नसेल, भ्रष्टाचाराचे आरोप असतील अशांना काळ्या यादीत टाकावे. ज्यांनी जादा पैसे उचलले असतील ते त्यांच्याकडून वसूल करावे. चांगल्या कामांना विरोधी पक्षांचा पाठिंबा राहील अशी ग्वाही विकास ठाकरे यांनी दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही गेल्या वर्षभरात शहरात २८३ कोटींची विकास कामे केली. शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रमेश सिंगारे यांनी दिली. यावेळी विलास उजवणे यांनीही मार्गदर्शन करून राऊ त यांना शुभेच्छा दिल्या. सभापती संदीप जोशी, गोपाल बोहरे, गिरीश देशमुख, मुन्ना यादव, सुनील अग्रवाल, संदीप जाधव, देवेंंद्र मेहर, अ‍ॅड. संजय बालपांडे, राजू नागुलवार, गौतम पाटील यांच्यासह पदधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालक दिव्या घुरडे यांनी तर आभार रश्मी फडणवीस यांनी मानले. राऊ त यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)