VIDEO: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ गोंडी नृत्यावर ताल धरतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 23:29 IST2021-01-04T23:29:17+5:302021-01-04T23:29:53+5:30
झिरवाळ यांनी गोंडी नृत्य पथकात धरला ठेका

VIDEO: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ गोंडी नृत्यावर ताल धरतात तेव्हा...
नागपूर: सर्वसामान्य कुटुंबातील अन जनसामान्यांमध्ये मिसळणारे म्हणून परिचित असलेल्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज नागपुरात त्यांच्या स्वागतास आलेच्या गोंडी नृत्य पथकात ताल धरत आदिवासी कलाकारांचा आनंद द्विगुणीत केला.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला गोंडी नृत्यावर ताल https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/drhd7PspWw
— Lokmat (@MiLOKMAT) January 4, 2021
नागपूर येथे विधानभवन उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी झीरवाळ रेल्वेने दाखल झालेल्या त्यांचे विदर्भातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक गोंडी नृत्य अविष्काराने स्वागत केले. या नृत्य पथकात झिरवाळ यांनी सहभागी होत ताल धरला. झिरवाळ यांच्या सहभागाने उपस्थित अवाक् झाले.