शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कारागृहात असलेले उपसंचालक नरड, नाईक आता सायबर पोलिसांच्या ताब्यात

By योगेश पांडे | Updated: April 17, 2025 22:59 IST

शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातील मोठे खुलासे होण्याची शक्यता

नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक उल्हास नरड, तसेच वरिष्ठ लिपीक सूरज नाईक यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. मुख्याध्यापक बोगस मान्यता प्रकरणात हे दोघेही कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची दोन दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे व त्यातून शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातील मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार केली. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने २४४ शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. यातील ३१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या‘शालार्थ आयडीं’ना उपसंचालक कार्यालयाने मान्यता दिली होती. उर्वरित ‘शालार्थ आयडी’ची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. नरडलाच अपात्र मुख्याध्यापकाचा ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांना नरड व नाईक यांचा ताबा हवा होता. पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर दोघांनाही ताब्यात घेतले.

नरडच्या पासवर्डचा गैरवापर झालाच कसा

सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार झाली होती. ‘शालार्थ आयडी’ निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. मात्र नरडच्या पासवर्डचा त्यांच्या माहितीशिवाय गैरवापर झालाच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या दिशेने सविस्तर चौकशी करणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी