शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:14 IST2018-05-31T21:14:29+5:302018-05-31T21:14:42+5:30

भावाच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव आहे.

Denial of marriage by establishing a correlation | शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार 

शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार 

ठळक मुद्देप्रेयसीची तक्रार : प्रियकर गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावाच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव आहे.
मोहित हा सोमवारी क्वॉर्टर परिसरात शाहू गार्डनजवळ राहतो. तो खासगी काम करतो. तर, पीडित तरुणी (वय १९) अजनीत राहते. ती गरीब कुटुंबातील असून बारावीपर्यंत शिकलेली आहे. आरोपी मोहित गुप्ताचा लहान भाऊ आणि पीडित मुलगी दोन वर्षांपूर्वी सोबत शिकत होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणेही होते. त्यातून आरोपी मोहितने पीडित तरुणीवर प्रेमजाळे फेकले. तिला आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. १२ मार्च २०१६ ते १७ एप्रिल २०१८ पर्यंत अनेकदा शरीरसबंध प्रस्थापित केल्यानंतर आता त्याने लग्नास नकार दिला. त्याची वारंवार समजूत काढूनही तो लग्नास तयार न झाल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याविरुद्ध बुधवारी सक्करदरा ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोहितविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
 

Web Title: Denial of marriage by establishing a correlation