शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:42 PM

आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.

ठळक मुद्देजयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक लाभ देणाऱ्या संस्थांचे खासगीकरण केले जात असून शासकीय संस्थांची स्वायत्तता संपविण्यात येत आहे. राज्य व स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करून सर्वांना केंद्राच्या हातचे बाहुले करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला संपविण्यात येत आहे. नावापुरती मतदान प्रक्रिया आहे, पण नागरिकांचे मतदानाचे स्वातंत्र्यच हिरावले जात आहे. आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनोबा विचार केंद्रातर्फे सर्वोदय आश्रम, धरमपेठ येथे ‘आजची लोकशाही आणि जयप्रकाश’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पांढरीपांडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, आश्रमाचे ट्रस्टी अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कुमार पुढे म्हणाले, केंद्र सरकारने स्वत:ला माहितीच्या अधिकारातून वगळले. सरकारचा तोटा कमी करण्यासाठी आरबीआयकडून १.६७ लाख कोटी रुपये काढण्यात आले. आता माहितीचा अधिकारच निरस्त करण्यात आल्याने आरबीआयकडून घेतलेला पैसा कुठे खर्च केला, याची माहितीही लागणार नाही. मत मागण्यासाठी जाती धर्माचा खुलेआम उपयोग केला जात आहे. प्रचंड बहुमताचे सरकार केंद्रात आहे व विरोधी पक्षाला संपविण्यात आले असून विरोधी सरकारे पाडली जात आहेत. निवडणूक आयोग, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक संस्था, विरोधी पक्ष, न्यायपालिका व नागरिकांना माहीत न करता संसदेत ४० विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आली. बीएसएनएल, रेल्वे अशा मजबूत सार्वजनिक संस्था बंद पाडून खासगी हातात दिल्या जात आहे. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत.जयप्रकाश यांना सामुदायिक लोकशाही व पंचायत अधिकार महत्त्वाचे होते व ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. मात्र सरकारद्वारे संपूर्ण सत्ता केंद्राकडे एकवटण्याचे काम करीत आहे. अर्थव्यवस्था बुडत आहे व बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संघीय व्यवस्था कमजोर करून विघटनाची स्थिती वाढवली जात आहे. विषमता वाढली आहे. सर्व माध्यमे उद्योगपतीच्या हातचे खेळणे झाले आहे.म्हणूनच ही अराजकता चालली असताना जनउपयोगी मुद्दे सोडून सरकारचे महिमामंडन करीत काश्मीर आणि पाकिस्तानकडेच लक्ष विचलित केले जात आहे. ही स्थिती ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. जेपींच्या अपेक्षेनुसार नागरिकांमध्ये क्षमता व सत्यासाठी चिंता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जेपी, गांधी आणि आंबेडकरी विचाराचे एकत्रित जनआंदोलन उभे राहण्याची नितांत गरज असल्याचे मनोगत ज्ञानेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. संचालन संदेश सिंगलकर यांनी तर वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर