लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दीक्षाभूमी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतील अंतर्गत वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. भिक्खू संघावरही त्याचे परिणाम पडू लागले आहेत. भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी दीक्षाभूमीच्या बुद्ध विहारातील भिक्खू डाॅ. सम्यकबोधी आणि भिक्खू विनय यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी भंते ससाई यांनी आम्हा दोघांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
भिक्खू डाॅ. सम्यकबोधी आणि भिक्खू विनय यांनी सांगितले की, ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून दीक्षाभूमीवर धम्म प्रचार प्रसाराचे कार्य करताहेत. दीक्षाभूमीच्या बौद्ध विहारातील निवासी भिक्खू सुगतबोधी यांचे निधन झाल्यामुळे बुद्ध विहारात व मध्यवर्ती स्तुपामध्ये दररोज वंदनेसाठी निवासी भिक्खू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांना ७ फेब्रुवारी रोजी नियुक्ती पत्र दिले. परंतु ११ फेब्रुवारी रोजी अध्यक्ष भंते सुरेई ससाई, भंते धम्मप्रकाश, सिक्युरीटी गार्ड सिद्धार्थ म्हैसकर आणि भंतेजीचा कारचालक यांनी आमच्या निवासात येऊन आम्हा दाेघांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आज गुरूवारी पुन्हा भंते ससाई आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली आणि त्यांचे शिष्य भंते धम्मप्रकाश यांची नियुक्ती केली.
एकूणच हा प्रकार अतिशय निंदणीय आहे तेव्हा भंते ससाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीकरावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसातही याची रितसर तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अशोक शेंद्रे, मंगला खोब्रागडे, मंदा गायकवाड, प्रतिभा कापसे, छाया दुपारे आदी महिलाही उपस्थित होत्या.
Web Summary : Bhikkhus Samyakbodhi and Vinay demand Bhante Surei Sasai's removal as committee head, alleging assault and life threats. They claim Sasai and associates physically attacked them after their appointment was revoked, replaced by Sasai's disciple. Police complaint to follow.
Web Summary : भिक्खु सम्यकबोधि और विनय ने भंते सुरेई ससाई को समिति प्रमुख से हटाने की मांग की, मारपीट और जान से मारने की धमकी का आरोप लगाया। उनका दावा है कि ससाई और सहयोगियों ने उनकी नियुक्ति रद्द होने के बाद उन पर शारीरिक हमला किया, और ससाई के शिष्य को नियुक्त किया गया। पुलिस में शिकायत दर्ज कराई जाएगी।