शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोविडच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून पेट्रोलिंग बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:50 IST

नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देआदिवासींच्या नावे पत्र कोरोना संक्रमणाची धास्ती

फहिम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घनदाट जंगलात अर्धसैनिक बल आणि पोलीसांमुळे त्रस्त असलेल्या नक्षल्यांनी आदिवासींच्या नावे पत्र जाहीर करत नक्षली भागात करण्यात येत असलेल्या पेट्रोलिंगला बंद करण्याची मागणी पुढे केली आहे.कोविड संक्रमण पसरण्याचे कारण पुढे करून आदिवासींना भडकविण्याचा प्रयत्न नक्षली करत आहेत. पोलीसांची पेट्रोलिंग सुरू राहिल्यास या भागात संक्रमणामुळे आदिवासी नाहक बळी पडण्याची बतावणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ऑपरेशन कधीच बंद होत नाहीहे नक्षल्यांचे षडयंत्र आहे. पोलीस आणि अर्धसैनिक बलामध्ये यदा कदा कोणी कोरोना संक्रमित आढळल्यास त्यास तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात येते. पेट्रोलिंगमुळे संक्रमण पसरण्याची जी भिती दाखवली जात आहे, ते साफ खोटे आहे. संक्रमण काळातही नक्षली भागात ऑपरेशन्स सुरू राहतील. ऑपरेशन्स कधीच बंद होत नाहीत.के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस महानिरीक्षक, नागपुर रेंजनक्षल्यांची आदिवासींविषयी खोटी सहानुभूतीया पत्रात नक्षल्यांनी ९ ऑगस्टला विश्व आदिवासी, मुलनिवासी दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारने आदिवासींचे अस्तित्त्व आणि अस्मिता संपविण्याचे प्रयत्न केले आहे. त्या विरोधात आदिवासींनी आक्रमक होण्याची सुचना त्यात करण्यात आली आहे. पत्राच्या सुरुवातीलाच संघटनेने केंद्र, छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारांना जनविरोधी असल्याची घोषणा केली आहे. आम्ही आदिवासी ग्राम सभांच्या अधिकारांचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, केंद्र सरकारकडून पेसा कायद्याच्या माध्यमातून ग्राम सभांचे अधिकार मर्यादित करण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकारांकडून ग्राम सभा स्थापन करून त्यांचे नेतृत्त्व जनविरोधी लोकांच्या हातात देण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिवाय, वनाधिकार कायद्यातील प्रस्तावित संशोधनातून आदिवासींना त्यांच्या जंगलातील अधिकारांपासून वंचित केले जात आहे. गेल्या काही वषार्पासून आदिवासी भागातील नक्षल्यांचा प्रभाव घसरत असून, आदिवासींच्या सहकायार्ने पोलीस व अर्धसैनिक बल नक्षल्यांवर भारी पडत आहेत. त्यामुळेच, आपला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नक्षल्यांचे हे प्रयत्न असल्याचे दिसून येते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस