शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली जिंकली, कार्यकर्ते जिंकले

By admin | Updated: February 11, 2015 02:24 IST

‘आप’च्या कार्यकर्त्यांसाठी ही केवळ नवी दिल्लीचीच नाही तर देशाच्या राजधानीची लढत होती. त्यामुळे ‘आप’ची शक्ती येथे दाखविण्यासाठी ...

मिशन राजधानीला उपराजधानीचे बुस्ट ‘आप’च्या कार्यकर्त्यांसाठी ही केवळ नवी दिल्लीचीच नाही तर देशाच्या राजधानीची लढत होती. त्यामुळे ‘आप’ची शक्ती येथे दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. दिल्लीत पोहोचल्यावर आमच्यासारखेच इतर कार्यकर्ते पाहून आणखी हुरुप आला आणि दुप्पट उत्साहाने प्रचारकामात लागलो. थंडी, तहानभूक विसरून सर्वांनी प्रचार केला. काही कार्यकर्ते तर चक्क तंबूत राहिले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ निकालांमध्ये दिसून आले आहे असे मत ‘आप’चे जिल्हा संयोजक देवेंद्र वानखडे यांनी दिले. सर्वत्र उत्साहदरम्यान, ‘न भूतो न भविष्यती’ अशा विजयाचा आनंद उपराजधानीतदेखील साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ‘आप’चे कार्यकर्ते कार्यालयात एकत्र आले होते. ‘एक्झिट पोल’मध्ये आशादायक कौल मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होताच. मंगळवारी सकाळी जसे जसे ‘ट्रेन्ड’ यायला लागले तशी तशी कार्यकर्त्यांची गर्दी आणखी वाढू लागली. बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर तर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शहरातील सर्व वयोगटातील कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते.विजय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाददुपारच्या सुमारास ‘आप’तर्फे धंतोली कार्यालयातून ‘विजय रॅली’ काढण्यात आली. लोकमत चौक, व्हेरायटी चौक, बर्डी मेन रोड, कॉटन मार्केट, टिळक पुतळा, अग्रसेन चौक, गांधीबाग, बडकस चौक, कोतवाली, गांधी गेटमार्गे ही ‘विजय रॅली’ काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. व्हेरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. शिवाय नागरिकांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.