शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:50 IST

दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे.

ठळक मुद्दे११७ संशयितांची पडली भर१०९ संशयितांचे नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे.  मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात तबलिग जमातमधील व्यक्तींचे नमुने नसल्याची माहिती आहे. नागपुरात आतापर्यंत १६ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील चार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित १२ मधून नऊ रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) तर तीन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेयोमध्ये सध्या ३८ तर मेडिकलमध्ये १९ संशयित रुग्ण भरती आहेत. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले तीन रुग्ण नागपुरात पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, निजामुद्दीन मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने येथून नागपुरात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज दिवसभरात दिल्ली आणि मरकजमधून आलेल्या एकूण ११७ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सध्या आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ३२८, वनामतीच्या विलगीकरण कक्षात ८४ तर रविभवनाच्या विलगीकरण कक्षात ३३ संशयितांना ठेवण्यात आले आहे. मेयो, मेडिकलची चमू या विलगीकरण कक्षात जाऊन त्यांचे नमुने घेत आहे. उद्या शुक्रवारी यातील काही नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.तो रुग्ण निगेटिव्हमध्य प्रदेश सिवनी येथील ५५ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाला मंगळवारी सायंकाळी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या नमुन्याचा आज गुरुवारी निगेटिव्ह अहवाल आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस