शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
6
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
7
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
8
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
9
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
10
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
12
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
13
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
14
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
15
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
16
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
17
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
20
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासाठी दिल्ली मार्च

By admin | Updated: July 14, 2014 02:55 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भाला स्वतंत्र

समितीचे आवाहन : २४ जुलैला धरणे आंदोलननागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भाला स्वतंत्र करण्यासाठी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली आहे. समितीतर्फे २४ जुलै रोजी जंतरमंतरवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी आज, रविवारी समितीची विशेष बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. विदर्भवादी नेते २३, २४ व २५ जुलै रोजी दिल्ली येथे मुक्कामी राहून विदर्भाचा नारा बुलंद करणार आहेत. २४ जुलै रोजी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ११ जिल्ह्यांतून प्रत्येकी १०० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. विदर्भातील खासदार, आमदार व माजी खासदार यांच्यासह विदर्भाला पाठिंबा असणारे पी. ए. संगमा, सुब्रमण्यम स्वामी, मायावती, उमा भारती व तेलंगणातील तीन खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. आंदोलनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व भाजपा अध्यक्षांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येईल. निवेदनात जनमत चाचणीच्या निकालाचा समावेश करण्यात आला आहे. वेद, जनमंच, व्ही-कॅन आदी संघटनांना पत्र पाठविण्यात आले आहे, असे चटप यांनी सांगितले.भाजपाने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यास विदर्भ स्वतंत्र करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय जहाज बांधणी व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाला लेखी पाठिंबा दिला होता. या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. सत्ताबदल झाल्यानंतर समितीने ११ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन धाडले होते. विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्र व विदर्भ विधानसभेच्या निवडणुका एकत्रच घ्याव्यात, अशी समितीची मागणी आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा चटप यांनी दिला. पत्रकार परिषदेत प्रबीरकुमार चक्रवर्ती, अ‍ॅड. नंदा पराते, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सदस्य नोंदणीसमितीतर्फे सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १० हजार अर्ज वितरित करण्यात आले आहेत. ३० आॅगस्टपर्यंत ५१ हजार सदस्य नोंदणी करण्याचे समितीचे लक्ष्य असल्याचे राम नेवले यांनी सांगितले.विदर्भस्तरीय अधिवेशन४ व ५ सप्टेंबर रोजी विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. विदर्भासंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्मरणिकेत असेल, असे दीपक निलावार यांनी सांगितले.