लाचखोर फौजदाराची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: March 14, 2015 02:33 IST2015-03-14T02:33:39+5:302015-03-14T02:33:39+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याचा ...

लाचखोर फौजदाराची कारागृहात रवानगी
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याचा परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राजाराम घोडाम याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली.
घोडामने एका डॉक्टरला रुग्णालय बेकायदेशीर असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३ लाख रुपये त्याने घेतले होते. १० मार्च रोजी तो भाजपचा कार्यकर्ता सूरज ऊर्फ सूर्यकांत गजानन लोलगे याच्या माध्यमातून याच डॉक्टरकडून ५ लाख रुपये घेत असताना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सूरजला पकडले होते. (प्रतिनिधी)