शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘एलआयटी’ला लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:24 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. ‘एलआयटी’ला ‘आयआयटी’ हून मोठी जागतिक शिक्षण संस्था बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘ग्लोबल अ‍ॅल्युमनी मीट-२०१८’चे आयोजन उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देनितीन गडकरींचे संकेत : ‘ग्लोबल अ‍ॅल्युमनी मीट’चे झाले उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. ‘एलआयटी’ला ‘आयआयटी’ हून मोठी जागतिक शिक्षण संस्था बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘ग्लोबल अ‍ॅल्युमनी मीट-२०१८’चे आयोजन उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.‘एलआयटी’च्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, ‘एलआयटी’चे संचालक डॉ.राजू मानकर, माजी प्र-कुलगुरू डॉ.महेशकुमार येन्की, उद्योगपती लोकसारंग हरदास, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘एलआयटी’ने जगभरात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे येथील संशोधन हे आहे. ‘एलआयटी’ने देशाच्या विकासात मौलिक योगदान दिले आहे. संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जगभरात आपल्या कर्तृत्वाने प्रगतीची शिखरे गाठत आहेत. वर्तमान काळात संशोधनावर जास्त भर देण्यात येत आहे. ‘इनोव्हेशन’ची आवश्यकता दिसून येत आहे. या आवश्यकता ‘एलआयटी’कडून पूर्ण करण्यात येईल. ‘एलआयटी’ला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्यासाठी तत्पर रहावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी संघटनेची स्मरणिका ‘लीटा संवाद’चे विमोचन करण्यात आले.नवरत्नांचा सन्मान

समारंभात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात उद्योगपती कमल नारायण सिठा, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचे संघटक जीवन प्रकाश गुप्ता, प्रख्यात उद्घोषक हरीश भिमानी, ‘एनबीएसी’चे अध्यक्ष श्याम बंग, आदित्य बिर्ला समूहाच्या व्यवस्थापन कार्पोरेशनचे संचालक दिलीप गौर, ‘रिलायन्स इंडस्ट्री’च्या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख विनायक मराठे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, संशोधक डॉ. उर्मिला दिवेकर व केंद्र सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष अरुण कुमार श्रीवास्तव यांचा समावेश होता.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर