शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:34 AM

कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देविविध कंपन्यांच्या डीलर्सची मागणी : वाहनांची विक्री वाढणार, शासनाला महसूल जास्त मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरीलजीएसटी कमी करण्याची गरज आहे. सरकारनेजीएसटीचा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला तर वाहन उत्पादकांसोबतच सरकारलाही फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया विविध कंपन्यांच्या डीलर्सनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऑटो संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना वाहनांवरील जीएसटी दर कमी होण्याचे संकेत दिले होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची मागणी पाहता जीएसटी दरामध्ये कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. वाहनांवरील जीएसटी कमी झाल्यास सणांमध्ये फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या वर्षाला २२ दशलक्ष दुचाकी विकल्या जातात. मात्र जर दुचाकी आणि चारचाकीच्या दरात वाढ झाली तर विक्रीवर परिणाम होऊ शकतो.फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष काळे म्हणाले, सध्या प्रवासी वाहन आणि दुचाकीवर तब्बल २८ टक्के जीएसटी लागतो. याशिवाय १५०० सीसीच्या वाहनांवर २२ टक्के अधिभार लावला जातो. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत आहे. वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची असोसिएशनची पूर्वीपासून मागणी आहे. आता केंद्रीय स्तरावर याची दखल घेतली आहे. कोरोना काळात वाहनांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यानंतरच्या महिन्यात विक्री वाढली, पण त्या प्रमाणात वाहनांची डिमांड वाढली नाही. अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढून शासनाला महसूलही जास्त प्रमाणात मिळेल. जीएसटीवर २२ टक्के अधिभार आकारण्यात येतो. त्यामुळे लक्झरी कारवर तब्बल ५० टक्के जीएसटी आकारणी होते. त्यामुळे कारच्या किमती वाढतात आणि लक्झरी कारच्या विक्रीवर परिणाम होतो.टाटा मोटर्सचे डीलर डॉ. पी.के. जैन म्हणाले, चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरील २८ टक्के जीएसटी १८ टक्के करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लक्झरी कारचा विचार केल्यास जीएसटी आणि अधिभार असा एकूण ५० टक्के कर लागतो. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल आणि शासनाला महसूल जास्त मिळेल. तसेच पूर्वीच्या तुलनेत आता डीलर्सला जीएसटीचा भरणा उत्पादन स्तरावर करावा लागतो. त्यामुळे डीलर्सची गुंतवणूक वाढली आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल. टाटा वाहनांना देशस्तरावर मागणी वाढली आहे. जीएसटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी पावले उचलावीत.पाटणी मारुतीचे महाव्यवस्थापक रवी जोशी म्हणाले, सणांचा सीझन जवळ आला आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये मागणी वाढविण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून कमी करून ते १८ टक्के केले जावेत. मारुतीमध्ये वाढ आहे. रिकव्हर केले आहे. बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीtwo wheelerदुचाकीcarकार