शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी नागपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत शनिवारी घट झाल्याचे दिसून ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी नागपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत शनिवारी घट झाल्याचे दिसून आले. २२०० पैकी १००० लाभार्थ्यांनीच लस घेतल्याने ४५ टक्केच लसीकरण झाले. विशेष म्हणजे, पोलीस हॉस्पिटलच्या केंद्रावर १०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले असताना त्यापैकी ५५ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात १७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

नागपूर ग्रामीणमध्ये तीन केंद्रांवर लसीकरण झाले. प्रत्येक केंद्राला १०० नुसार ३०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १६६ लाभार्थ्यांनी लस घेतली. याचे प्रमाण ३५.३३ टक्के आहे. शहरात १९ केंद्रांनाही प्रत्येकी १०० नुसार १९०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ८३४ लसीकरण झाले. याचे प्रमाण ४३.८९ टक्के आहे. यात मेयोमध्ये २० टक्के, एम्समध्ये १५ टक्के, डागामध्ये १६ टक्के, पाचपावली ‘अ’ केंद्रावर ९० टक्के, ‘ब’ केंद्रावर २२ टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलच्या केंद्रावर ६० टक्के, मेडिकलच्या ‘अ’ केंद्रावर ४० टक्के, ‘ब’ केंद्रावर ५५ टक्के, ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या केंद्रावर ७० टक्के, सिम्स हॉस्पिटलच्या केंद्रावर ३४ टक्के, दंदे हॉस्पिटलच्या केंद्रावर ६४ टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या केंद्रावर ४७ टक्के, विमा हॉस्पिटलच्या केंद्रावर ३७ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलच्या केंद्रावर ५२ टक्के, अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ४० टक्के, म्युर मेमोरीअल हॉस्पिटलच्या केंद्रावर ५५ टक्के, आयजीआर केंद्रावर ४८ टक्के तर पोलीस हॉस्पिटलच्या केंद्रावर ५५ टक्के लसीकरण झाले.

- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली लस

पोलीस हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सुरुवात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लस घेऊन केली. या वेळी अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) डॉ. दिलीप झलके, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. संदीप पखाले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विजयप्रताप परिहार, सार्थक नेहेते, अनिल मेश्राम यांनी लसीकरण केले.