शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 06:32 IST

मुलांच्या प्रमाणात ९४ टक्क्यांहून कमी जन्म

ठळक मुद्देमाहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या २०११ सालापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ही बाब लक्षात आली आहे.

योगेश पांडेनागपूर : उपराजधानी नागपुरात मुलींचा जन्मदर परत एकदा घटला आहे. २०१९ साली मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी नऊ वर्षांत प्रथमच ९५ टक्क्यांच्या वर गेली होती. मात्र, कोरोना वर्षात मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४ टक्क्यांच्या खाली आली. २०११ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण जन्माचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या २०११ सालापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ही बाब लक्षात आली आहे. २०२० साली २३ हजार २२८ मुलांचा जन्म झाला व मुलींच्या जन्माचा आकडा २१ हजार ७५० इतका होता. मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.६४ टक्के इतकी होती. २०१९ साली हीच टक्केवारी ९५.२९ टक्के इतकी होती. २०११ साली शहरात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.२६ टक्के इतकी होती. २०१५ साली ही टक्केवारी ९४.२२ तर २०१८ साली ९४.२४ टक्के इतक्यावर पोहोचली. २०१६ सालानंतर प्रथमच मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.६५ टक्क्यांच्या खाली गेली.

दरम्यान, २०२१ वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यांत शहरात ८ हजार ८७९ बालकांचा जन्म झाला. त्यात ४ हजार ५५९ मुले व ४ हजार ३२० मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४.७६ टक्क्यांवर आली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या