मागणीअभावी खाद्यतेलात घसरण! सोयाबीनमध्ये १० रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:17 PM2020-05-12T21:17:49+5:302020-05-12T21:20:46+5:30

मार्च आणि एप्रिलमध्ये आकाशाला भिडलेले खाद्यतेलाचे भाव मे महिन्यात घसरले आहेत. एप्रिलमध्ये १०५ ते १०७ रुपयांपर्यंत विकण्यात आलेले सोयाबीन तेल सध्या ९५ ते ९७ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या खाद्यतेलाला मागणी कमी असून पुढे भाव आणखी कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

Decline in edible oil due to lack of demand! Soybeans fall by Rs 10 | मागणीअभावी खाद्यतेलात घसरण! सोयाबीनमध्ये १० रुपयांची घट

मागणीअभावी खाद्यतेलात घसरण! सोयाबीनमध्ये १० रुपयांची घट

Next
ठळक मुद्देग्राहकांची वाजवीपेक्षा जास्त खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च आणि एप्रिलमध्ये आकाशाला भिडलेले खाद्यतेलाचे भाव मे महिन्यात घसरले आहेत. एप्रिलमध्ये १०५ ते १०७ रुपयांपर्यंत विकण्यात आलेले सोयाबीन तेल सध्या ९५ ते ९७ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या खाद्यतेलाला मागणी कमी असून पुढे भाव आणखी कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या २४ मार्चच्या लॉकडाऊननंतर खाद्यतेलाचे उत्पादन प्रकल्प आणि पॅकिंग कारखाने बंद पडले. खाद्यतेलाचा साठा संपण्याच्या भीतीने ग्राहकांनी पाच किलोऐवजी १५ किलो टीन खरेदी केला. गेल्या महिन्यात जीवनावश्यक वस्तूंमध्ये ग्राहकांनी सर्वाधिक खाद्यतेलाची खरेदी केली. तुटवडा होण्याच्या भीतीने चिल्लर विक्रेत्यांनी दर वाढवून कमाई केली.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दरवाढीचा आरोप ठोक विक्रेत्यांवर होताच ऑईल मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन खाद्यतेलाचे कमाल दर निश्चित केले होते. सोयाबीन तेल टीन (१५ किलो) १,५५० रुपये, सनफ्लॉवर १,५५० रुपये आणि शेंगदाणा तेल २,२५० रुपये (किरकोळमध्ये १५० रुपये) असे भाव निश्चित केले. त्यानंतरही जास्त भावात विक्री सुरूच होती. एप्रिलच्या तिसºया आठवड्यात खाद्यतेलाचे प्रकल्प आणि पॅकिंग कारखाने सुरू झाल्यानंतर मुबलक साठा बाजारात उपलब्ध झाला. त्यानंतरही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरूच होती. पण आता मे महिन्यात मागणी हळूहळू कमी झाली असून स्टॉक करणाºया ग्राहकांचे प्रमाणही कमी झाल्याने खाद्यतेलाच्या भावात घसरण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मागणी नसतानाही शेंगदाणा तेल १५० रुपये
बाजारपेठेत शेंगदाणा तेलाला १० टक्केच मागणी असतानाही भाव वाढतच आहे. लॉकडाऊनपूर्वी १२२ ते १२५ रुपये किलोवर असलेले भाव आता १५० रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये शेंगदाणाचे उत्पादन ५० टक्केच आहे. लॉकडाऊनमध्ये या राज्यातून प्रकल्पांना शेंगदाना मिळण्यास अडचणी येत आहेत. याच कारणामुळे शेंगदाणा तेल महाग आहे.

पामोलिन तेलात प्रचंड घसरण
सोयाबीनच्या तुलनेत पामोलिन तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. लहानमोठे सर्वच हॉटेल बंद असल्याचा परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. पामोलिन तेलाचे भाव २० दिवसात २५० रुपये टीन (१५ किलो) घसरले आहेत. किरकोळमध्ये ८५ रुपये किलो भाव आहेत. घसरण झाल्यानंतरही उठाव नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Decline in edible oil due to lack of demand! Soybeans fall by Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.