दरोडा टाकण्याचे ठरवले, वेळीच पोलिसांनी घेरले; चौघांना अटक, एक फरार
By दयानंद पाईकराव | Updated: November 18, 2023 19:45 IST2023-11-18T19:45:20+5:302023-11-18T19:45:52+5:30
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना नविन कामठी पोलिसांनी अटक केली.

दरोडा टाकण्याचे ठरवले, वेळीच पोलिसांनी घेरले; चौघांना अटक, एक फरार
नागपूर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना नविन कामठी पोलिसांनीअटक केली असून त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना अजनी गावाजवळील चर्च समोरील चौकात शनिवारी रात्री १२.२४ वाजताच्या सुमारास घडली.
बादल संजय संतापे (वय २०, रा. रमानगर कामठी), रूपेश राजु लारोकार (वय २२, रा. पार्वतीनगर कळमना), आशिष उर्फ चिपड्या मामा प्रमोद बागडे (वय ३०, रा. जयभीम चौक, कामठी), मो. जुबेर मो. आरीफ (वय ३७, रा. वाल्मिकीनगर नया गोदाम कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार अशफाक (वय ३५) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू, एक तलवार, नायलॉन दोरी, मिरची पावडर, स्टीलचा रॉड असा एकुण ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४/२५, १३५ नुसार गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे.