Decided! Inauguration of Metro's Aqua Line on January 28th | ठरलं ! 'मेट्रो'च्या 'अ‍ॅक्वा लाईन'चे २८ जानेवारीला उद्घाटन
ठरलं ! 'मेट्रो'च्या 'अ‍ॅक्वा लाईन'चे २८ जानेवारीला उद्घाटन

ठळक मुद्देमुख्यमंत्री ‘व्हिडीओ लिंक’द्वारे दाखविणार हिरवी झेंडी : नितीन गडकरी राहणार उपस्थित

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : ‘महामेट्रो’च्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’ सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. २८ जानेवारी रोजी सुभाषनगर मेट्रो स्थानकावर सकाळी १०.१५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवतील तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रत्यक्ष उपस्थित राहतील. या मार्गाचे उद्घाटन कधी होणार याची नागरिकांमध्ये बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. ‘लोकमत’ने सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता हे विशेष.
केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी हे देखील या कार्यक्रमात ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून सहभागी होतील. याशिवाय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खा.विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.बृजेश दीक्षित यांनी दिली.

Web Title: Decided! Inauguration of Metro's Aqua Line on January 28th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.