नागपुरात हायटेन्शन लाईनच्या करंटने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:44 IST2018-11-23T00:43:38+5:302018-11-23T00:44:27+5:30

उच्च विजेच्या वाहिनीचा (हायटेन्शन लाईन) जोरदार करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला तर त्याची पाचवर्षीय भाची जबर जखमी झाली.

 Death of the youth by high-tension line in Nagpur | नागपुरात हायटेन्शन लाईनच्या करंटने तरुणाचा मृत्यू

नागपुरात हायटेन्शन लाईनच्या करंटने तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देकळमना भागात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च विजेच्या वाहिनीचा (हायटेन्शन लाईन) जोरदार करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला तर त्याची पाचवर्षीय भाची जबर जखमी झाली. अभिमन्यू यादव (वय २५), असे मृताचे आणि मयूरी जितेंद्र निर्मलकर असे जखमी बालिकेचे नाव आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगरात गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

Web Title:  Death of the youth by high-tension line in Nagpur