शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूर  जिल्ह्यातील मनसर  भागात टेम्पोखाली दबून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:02 AM

टेम्पोच्या सावलीत जेवण करण्यास बसलेल्या मजुरांवर टेम्पो उलटला. त्यात दबून दोघांचा मृत्यू झाला. मृतात एका पुरुषाचा तर एका महिलेचा समावेश आहे. सोसाट्याच्या वादळामुळे टेम्पो उलटला हे विशेष! यात चार महिला सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना मनसरनजीकच्या सत्रापूर शिवारातील घटाटे मालगुजारी तलावालगत बुधवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देचार महिला सुखरूप : वादळाने केला घात, सत्रापूर शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमनसर : टेम्पोच्या सावलीत जेवण करण्यास बसलेल्या मजुरांवर टेम्पो उलटला. त्यात दबून दोघांचा मृत्यू झाला. मृतात एका पुरुषाचा तर एका महिलेचा समावेश आहे. सोसाट्याच्या वादळामुळे टेम्पो उलटला हे विशेष! यात चार महिला सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना मनसरनजीकच्या सत्रापूर शिवारातील घटाटे मालगुजारी तलावालगत बुधवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर तब्बल तीन तास उशिराने पारशिवनी पोलीस पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.टेम्पोचालक महेश शंकर जामखुरे (२६) आणि सुनीता पंचम ताकोद (३५) दोघेही रा. कांद्री वस्ती अशी मृतांची नावे आहेत. माहुली मार्गावरील रॅक पॉवर बायोगॅस प्लांटमध्ये वीज निर्मितीसाठी कचरा, तुराट्या, पºहाटी, बेशरम आदी टनाच्या हिशेबाने विकत घेतला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिक बेशरम तोडणीसाठी जातात. अशाप्रकारेच कांद्री येथील टेम्पोमालक शंकर काशीराम जामखुरे यांचा मुलगा महेश, त्याची आई माया शंकर जामखुरे (४५), लक्ष्मी श्रीहरी उके (३०), निर्मला मनोहर नान्हे (४०), सुनीता पंचम ताकोद आणि त्रिवेणी गजानन सोनटक्के (३९) सर्व रा. कांद्रीवस्ती हे कांद्रीपासून सहा किमी अंतरावरील घटाटे मालगुजारी तलावालगत सदाफुली तोडायला एमएच-३१/एम-६३५० क्रमांकाच्या ४०७ टेम्पोने आले. सदाफुली तोडल्यानंतर गठ्ठे बांधून टेम्पोलगत ठेवले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सर्वजण टेम्पोच्या सावलीत जेवण करायला बसले. त्याचवेळी सोसाट्याचे वादळ सुटले आणि टेम्पो उलटला. क्षणार्धात काही समजण्याआधीच त्याखाली महेश आणि सुनीता दबल्या गेले. इतर महिला बचावल्या.टेम्पो उलटताच बचावलेल्या महिलांपैकी एक सत्रापूर गावाकडे धावत गेली. त्यानंतर काही वेळातच १५-१६ नागरिक धावून आले. तोपर्यंत बराच वेळ झालेला होता. नागरिकांनी टेम्पो बाजूला केला. मात्र त्याखाली दबलेल्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. याबाबत पारशिवनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तपास ठाणेदार दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनात संजय शिंदे, प्रमोद कोठे, अनिल मिश्रा, विजय बिसेन करीत आहे.तो घास ठरला अखेरचा!कांद्री परिसरातील अनेकांनी कचरा संकलनाला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळीच हे मजूर कचरा संकलनासाठी बाहेर निघतात. अशाप्रकारचे पाच महिलांसह टेम्पोचालक सत्रापूर शिवारात आला. तेथे कचरा संकलन केल्यानंतर घराकडे निघण्यापूर्वी सर्वजण टेम्पोच्या आडोशाने सावलीत जेवणासाठी बसले. मात्र तेव्हाच वादळ सुटले आणि पोटात घास टाकताच टेम्पो उलटला. त्यात दबून एका महिलेसह टेम्पोचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू