शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नागपूर-उमरेड मार्गावर भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 21:54 IST

उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देरास्ता रोको, तणाव : मृत तरुण चंद्रपूरचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.तेजस खासगी प्रवासी बसवर (ट्रॅव्हल्स) वाहक म्हणून काम करायचा. नेहमीप्रमाणे चंद्रपुरातून प्रवासी घेऊन तो एमएच ४०/ बीजी ०६२२ ने गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरात आला. नागपुरात विविध ठिकाणी प्रवासी उतरत असल्याने तसेच चालकाला दुसऱ्या बाजूला काही अडथळे नसल्याचे सांगण्यासाठी तो दारावर उभा होता. भांडे प्लॉट चौकाजवळ एक ट्रॅक्टर (एमएच ३१/ एएच ७५४०) आले. या ट्रॅक्टरमध्ये ठेवून असलेल्या बल्लीमधील एक बल्ली बाहेर निघाली होती. दोन्ही वाहने जवळ आली असताना बाहेर आलेल्या बल्लीचे टोक तेजसच्या डोक्याला लागले. त्यामुळे तो खाली पडून त्याच्याच बसच्या चाकात चिरडला गेला. या भीषण अपघातामुळे अल्पावधीतच तेथे मोठा जमाव जमला. वाहने आडवेतिडवे झाल्याने तेथे रास्ता रोकोची स्थिती झाली. प्रचंड तणावही निर्माण झाला. माहिती कळताच वाहतूक शाखा तसेच सक्करदरा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जमावाला शांत करत तेजसचा मृतदेह रुग्णालयात पाठविला.विशेष म्हणजे, वाहतुकीच्या अनुषंगाने हा मार्ग अतिशय धोकादायक असल्याचे वारंवार उघड झाले आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडेही त्याची नोंद आहे. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही.मानकापुरातही अपघातबुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पागलखाना चौकाजवळ दोन वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीचालक भीमराव सुखदेवे (वय ५८) यांचा करुण अंत झाला. सुखदेवे वेलकम सोसायटीत राहत होते. बुधवारी सायंकाळी ते अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ३१/ ईएक्स ५६५०) पागलखाना चौकाकडे जात होते. एनएडीटी गेटसमोर एसटी बस क्रमांक एमएच ४०/ एन ८४९८ तसेच स्विफ्ट क्रमांक एमएच ४९/ एटी ११०८ च्या चालकाने एकमेकांना धडक मारली. त्यानंतर सुखदेवे यांच्या दुचाकीला धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अभय भीमराव सुखदेवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बस आणि स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू