शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

विद्युत धक्क्याने विद्यार्थ्याचा शाळेतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:55 PM

शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील  जुनेवाणी येथील घटना : अर्थिंग तारांमध्ये वीज प्रवाहित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्यावेळी शाळेत एकही शिक्षक हजर नव्हता. विशेष म्हणजे, त्या शाळेत वीज ‘कनेक्शन’ नसल्याने शिक्षकाने शेजारच्या घरून एका वायरने वीजपुरवठा घेतला आहे. त्याला शाळेत ‘अर्थिंग’ दिले आहे.अमन चंद्रशेखर धुर्वे (८, रा. जुनेवाणी, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. ही शाळा रोज सकाळी १० वाजता सुरू होत असली तरी विद्यार्थी काही वेळेआधीच शाळेत यायला सुरुवात होते. त्या काळात ते शिक्षक येईपर्यंत आवारात खेळत असतात. अशाप्रकारेच अमन शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात खेळ होता. खेळताना त्याचा स्पर्श भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ला झाला. त्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. स्थानिक तरुणाने आधी वीजपुरवठा खंडित करून त्याला बाजूला केले आणि पालकांसोबत लगेच देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.माहिती मिळताच सुरुवातीला ठाणेदार सुरेश मट्टामी, नंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, खंडविकास अधिकारी रावसाहेब यावले, गटशिक्षणाधिकारी नितीन वाघमारे, गोंडवाणा गणतंत्र पक्षाचे वासुदेवशहा टेकाम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच अमनच्या पालकाचे सांत्वन केले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.उघड्या ‘अर्थिंग’ने केला घातया शाळेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे खंडित केला होता. त्यामुळे शिक्षकांनी शेजारच्या घरून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा घेतला होता. तो घेताना शिक्षकांनी केवळ एका वायरचा वापर करून ‘अर्थिंग’ शाळेतच दिला. ती ‘अर्थिंग’ तार भिंतीच्या शेजारी लावली असून, तिला सुरक्षेच्यादृष्टीने छोट्या ‘पीव्हीसी पाईप’चे ‘कव्हर’ लावले नव्हते. त्या ‘अर्थिंग’ला ‘पीव्हीसी पाईप’ लावला असता किंवा घरून वीजपुरवठा घेताना ‘फेज’सोबतच दुसऱ्या वायरने ‘अर्थिंग’ घेतले असते तर कदाचित ही घटना टळू शकली असती. अमन हा त्याच्या आईवडिलांचा एकुलताएक मुलगा असून, त्याला दोन बहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे आईवडील शेतीची कामे करून उदरनिर्वाह करतात. अमनच्या शरीरात आधीच रक्ताची कमतरता असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. शिवाय, त्याची देवलापार येथील शाळेत शिकण्याची इच्छा होती. मात्र, प्रकृती व आर्थिक परिस्थितीमुळे त्याला गावातील शाळेत शिकविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.पाच वर्ग; ३७ विद्यार्थीया शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, एकूण पटसंख्या ३७ आहे. त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नीलकमल भोयर व सपना मानकर या दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. सहायक शिक्षिका मानकर यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचा प्रभार आहे. दोघेही मुख्यालयी राहात नसून, ते रोज नागपूरहून ये - जा करतात. अमनला रुग्णालयात नेत असताना दोन्ही शिक्षक देवलापार - जुनेवाणी मार्गावर भेटल्याची माहिती नागरिकांनी दिली. वर्गखोल्यांच्या चाब्या शिक्षकांऐवजी गावातच असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.दुर्दैवी घटनाजुणेवाणी शाळेत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, ऐकताच जबर धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यात सर्व कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. नितीन वाघमारे,गटशिक्षणाधिकारी, रामटेक. 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू