शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रशासनात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:14 PM

नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी येथील राहणारा आहे. तो त्याच्या भावासह या आश्रम शाळेत शिक्षण घेत होता.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण अस्पष्ट : दुपारी झाल्या होत्या ओकाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नरखेड) : नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी येथील राहणारा आहे. तो त्याच्या भावासह या आश्रम शाळेत शिक्षण घेत होता.होळीसाठी गावाला गेलेला यश २५ मार्च रोजी सकाळी शाळेत आला. शाळेच्या प्रतिदिनानुसार सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण घेतल्यानंतर तो मित्रांसोबत खेळलाही. मात्र सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याला ओकाऱ्या व्हायला सुरुवात झाली. शाळेतील शिक्षकांनी त्याला उपचारासाठी नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशची प्रकृती साधारण असल्याने त्याला सुटी दिली. शिक्षक त्याला आश्रम शाळेत घेऊन आले. संध्याकाळी तो त्याचा मोठा भाऊ राजा उईके याच्याजवळ झोपला. निवासी शिक्षक त्याच्या प्रकृतीकडे झोपेपर्यंत लक्ष ठेवून होते. मंगळवारी शाळेच्या नियमावलीनुसार सकाळी ५.३० वाजता सर्व विद्यार्थ्यांना दिनचर्येसाठी उठविण्यात आले. परंतु सर्व विद्यार्थी उठल्यानंतर यश उठला की नाही याची विचारपूस करण्याकरिता निवासी शिक्षक त्याच्याजवळ गेले असता तो निपचित पडलेला होता. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्याला सकाळी ६ वाजता नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर यशचा मृतदेह नातेवाईकाकडे सुुपूर्द करण्यात आला. यशच्या मृत्यूची नोंद नरखेड पोलिसांनी घेतली असून, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.प्रशासनात खळबळआश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे कळताच नागपूरचे आदिवासी विकास प्र्रकल्प अधिकारी डिगांबर चौव्हाण, तहसीलदार हरीश गाडे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वनकडस हे पिठोरी येथील आश्रम शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळेची प्राथमिक पाहणी केली. यानंतर नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू