शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 7:44 PM

एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर (वय १८) हिचा अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.

ठळक मुद्देएकतर्फी प्रेमाचा बळी ठरली : पावणेतीन महिने मृत्यूशी झुंज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर (वय १८) हिचा अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणारी सानिका अशोका हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमलगत तिच्या मामांचे (अविनाश पाटणे) फायनान्स कार्यालयात काम करायची. खामल्यातील रोहित हेमनानी (बोलाणी) नामक माथेफिरूसोबत तिचे दोन वर्षांपासून मित्रत्वाचे संबंध होते. तो खामल्यातील सिंधी कॉलनीत राहतो. त्याचे मोबाईल शॉप आहे. काही दिवसांपूर्वी त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्याने त्याला सानिकाने टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली होती. त्यामुळे तिने त्याला १ जुलैला रात्री मामांच्या (पाटणेंच्या) कार्यालयात भेटायला बोलवले होते. तो तेथे आला काही वेळ चांगला बोलला. नंतर आरोपी हेमनानीने पँटमध्ये लवपून ठेवलेला चाकू बाहेर काढून अचानक सानिकावर चाकूचे सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सानिकाच्या आईवडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला. सानिकानेही तब्बल पावणेतीन महिने जगण्या-मरण्याची लढाई लढली मात्र आज अखेर तिचा संघर्ष थांबला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून