अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:08+5:302020-12-04T04:23:08+5:30
वाडी : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले हाेते. यातील जखमी व्यक्तीचा मंगळवारी (दि.१) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही ...

अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू
वाडी : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाले हाेते. यातील जखमी व्यक्तीचा मंगळवारी (दि.१) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना लाव्हा परिसरात साेमवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास घडली हाेती. सूर्यभान राघाेजी ढाेक (५५) असे मृताचे नाव आहे. लाव्हा चौकातील डीपीजवळ सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास खडगाव खदानीवरून मुरुमाने भरलेला एमएच-४० एके-७७१९ क्रमांकाच्या ट्रकने सूर्यभान ढाेक यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार सूर्यभान व त्यांची पत्नी लीलाबाई ढाेक हे दाम्पत्य जखमी झाले हाेते. दरम्यान, मंगळवारी सूर्यभान यांचा खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर लाव्हा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.