शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाघाशी झुंज दिल्यानंतर तेंदूपत्ता मजुराचा मृत्यू

By admin | Updated: May 18, 2014 01:04 IST

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या देवराववर वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यानेही हिंमत न हारता वाघाशी झुंज दिली. यात तो गंभीर जखमी झाला खरा;

चंद्रपूर: तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या देवराववर वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यानेही हिंमत न हारता वाघाशी झुंज दिली. यात तो गंभीर जखमी झाला खरा; पण त्याने वाघाला पिटाळून लावले. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत गावात आल्यानंतर देवरावचा मृत्यू झाला. घटना येथून जवळच असलेल्या मामला गावाजवळ घडली. देवराव रामसुर गावंडे (३५) रा. मुंगरमेंढा (सिंदेवाही) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. मागील काही दिवसांपासून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु आहे. यामुळे मोठ्या प्रमामात मजूर जंगल परिसरात तेंदू संकलन करण्यासाठी जातात. सिंदेवाही तालुक्यातील देवराव हा आपल्या सहकार्‍यांसह चंद्रपूर येथून जवळच असलेल्या मामला या गावामध्ये तेंदुपत्ता तोडाईसाठी आला होता. दररोज तेंदूसंकलन करण्याचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान देवराव जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला केला. वाघासोबत तब्बल पंधरा मिनीटांपर्यंत त्याने झुंज दिली. वाघ पळून गेला. मात्र देवराव गंभीर जखमी झाला. अशाही जखमी अवस्थेत रक्तबंबाळ स्थितीत तो गावात एकटाच कसाबसा चालत आला. मात्र गावात पोहचताच काही वेळातच त्याने प्राण सोडला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. देवराववर हल्ला करणारा प्राणी वाघ होता की बिबट्या हे अद्याप निश्चित नाही. उत्तरीय तपासणीनंतर आणि घटनास्थळावरील पहाणीनंतरच हे स्पष्ट होणार आहे. (नगर प्र्रतिनिधी)