तेलंगाणा एक्स्प्रेसमध्ये वृद्ध प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:06 IST2019-02-08T00:05:57+5:302019-02-08T00:06:47+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.

तेलंगाणा एक्स्प्रेसमध्ये वृद्ध प्रवाशाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.
पाच वर्षापूर्वी भिलाई येथून इतवारी रेल्वेस्थानकावर आलेल्या मालगाडीच्या डब्यात एक मृतदेह आढळला होता. या डब्याला मोतीबागमध्ये आणल्यानंतर त्यातून दुर्गंधी आल्यामुळे या घटनेचा खुलासा झाला होता. आज झालेल्या घटनेत नागपुरात आलेला वृद्ध प्रवासी कोणत्या रेल्वेस्थानकावरून बसला होता, त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की कुणी कोचमध्ये मृतदेह आणून ठेवला आदी प्रश्न उपस्थित करण्यता येत आहेत. या घटनेत दिल्ली-हैदराबाद तेलंगाणा एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी १० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या एस ९ कोचमध्ये कुणीच प्रवासी नव्हते. केवळ बेशुद्ध अवस्थेत असलेला प्रवासी कोचमध्ये असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना आणि रेल्वेच्या डॉक्टरांना दिली. रेल्वेच्या डॉक्टरांनी वृद्ध प्रवाशास तपासून मृत घोषित केले. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. मृताच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर, कत्थ्या रंगाची फुलपँट आहे. वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष असून मृतदेहाची ओळख पटली नाही. तपास हेड कॉन्स्टेबल बाबर शेख करीत आहेत.