मशीनचा करंट लागून मिस्त्रीचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: July 29, 2023 19:26 IST2023-07-29T19:25:59+5:302023-07-29T19:26:22+5:30

त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

death of mason due to electrocution of machine | मशीनचा करंट लागून मिस्त्रीचा मृत्यू

मशीनचा करंट लागून मिस्त्रीचा मृत्यू

दयानंद पाईकराव, नागपूर : मशीनचा करंट लागून एका मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. नरेश शालीकराम शेंडे (वय ४४, रा. साई मंदिराजवळ, बरडेनगर, बोरगाव) असे मृत्यू झालेल्या मिस्त्रीचे नाव आहे.

मानकापूर येथे कोल्हे ले आऊटमध्ये स्लॅबवर काम सुरु असताना मिस्त्री नरेशने व्हायब्रेट मशीन सुरु केली. तो लोखंडी शिडी ठेवत असताना त्याला मशीनचा करंट लागल्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी विपनलाल प्रल्हाद केदार (वय ३०, रा. प्रशांत कॉलनी, गोरेवाडा) यांनी दिलेल्या सूचनेवरून मानकापूरचे उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत मिस्त्री नरेश हा मुळचा भंडारा येथील रहिवासी असून त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: death of mason due to electrocution of machine

टॅग्स :nagpurनागपूर