ऐन दसऱ्याच्या दिवशी कर्तव्यावर जाणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 19:24 IST2022-10-06T19:24:14+5:302022-10-06T19:24:41+5:30
Nagpur News दसऱ्याच्या दिवशी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका परिचारिकेचा अपघाती मृत्यू झाला.

ऐन दसऱ्याच्या दिवशी कर्तव्यावर जाणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू
नागपूर : दसऱ्याच्या दिवशी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या एका परिचारिकेचा अपघातीमृत्यू झाला. मुसळधार पावसात समोरील ट्रक न दिसल्याने तिची दुचाकी त्यावर आदळली व तिचा मृत्यू झाला. प्रांजली गावंडे (वय २२) असे मृत परिचारिकेचे नाव आहे.
बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास प्रांजली कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेरकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुलावरून जात होती. त्याचवेळी मुसळधार पाऊस येत होता व आरजे ०४ जीसी ११४४ या ट्रकच्या चालकाने वाहन रस्त्यावरच निष्काळजीपणे लावले होते. पावसामुळे प्रांजलीला ट्रक दिसला नाही व ती मागून ट्रकवर आदळली. तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.