नागपुरात मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:22 IST2019-05-06T22:21:05+5:302019-05-06T22:22:44+5:30

हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला.

Death of labor due to the collapse from the building in Nagpur | नागपुरात मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू

नागपुरात मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला.
उईके हा मूळचा शिवनी (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील नवेगाव-धोबेसरा येथील रहिवासी होता. तो नागपुरात इमारतीच्या वॉटर प्रूफिंगचे काम करायचा. याच कामाच्या निमित्ताने हुडकेश्वरमधील उपरोक्त इमारतीत आला होता. तो पाचव्या माळ्यावरील पाण्याच्या टाकीवर झोपला होता. रविवारी मध्यरात्री तो झोपेतून लघुशंकेसाठी उतरत असताना तोल जाऊन खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या उईकेचा करुण अंत झाला. त्याचा सहकारी अमोल संपत मसराम (वय २२, रा. पेंडकापार, रामटेक) याच्या तकारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Death of labor due to the collapse from the building in Nagpur