शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:02 AM

मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचप्पल काढणे जीवावर बेतले : खापरीतील घटनेने परिसरात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अमन आनंद लांडगे (रा. खापरी पुनर्वसन) असे मृत मुलाचे नाव आहे.खापरीत राहणारे अमन लांडगे, वंश रॉय आणि बंटी हे तिघे आज मंगळवारी खापरी येथील एका मैदानावर खेळत होते. वंशने फेकलेली चप्पल मैदानाच्या बाजूला असलेल्या बंद अवस्थेतील मोडकळीस आलेल्या पानठेल्याच्या छतावर पडली. ती चप्पल काढण्यासाठी अमन, वंश आणि बंटी तिघेही प्रयत्न करीत होते. दरम्यान, अमन पानठेल्यात शिरला. त्याला वंश मदत करीत होता. चप्पल खाली पाडण्यासाठी त्यांनी काठीने प्रयत्न केला. ती पडत नसल्याचे पाहून त्यांनी पानठेला हलविण्यास सुरुवात केली. सडलेल्या लाकडामुळे पानठेला अमनच्या अंगावर पडला. छोट्याशा अमनच्या छातीवर मोठे लाकूड पडल्याने तो बेशुद्ध पडला. पानठेल्याखाली वंशचाही पाय अडकला. ते पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अमनला मृत घोषित केले तर वंशवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बेलतरोडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात