लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकावर १४ एप्रिलला नवनिर्मित वॉशिंग साईडच्या लाईनची स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेत इतवारी लोहमार्ग पोलिसांनी संबंधित कंत्राटदारासह सुपरवायजारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.मनोज अरोरा (४०) रा. मेकोसाबाग असे कंत्राटदाराचे तर चामलिंग पाचकोथीदास (४५) रा. नंदनवन असे सुपरवायजरचे नाव आहे. मृत कामगार सुभाष हा रेल्वेस्थानकावर कंत्राटी कामगार होता. त्याचे नातेवाईक पारडी परिसरात राहतात. सुभाष त्यांच्या घराजवळ किरायाने खोली घेऊन राहत होता. गावाकडे आईवडिल, तीन भाऊ असून तो त्यांना आर्थिक मदत करीत होता. त्याच्या एका भावाचे लग्न झाले असून दुसऱ्या भावाचे लग्न ठरले आहे. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशी तो गावाकडे जाणार होता. परंतु दुर्दैवाने १४ एप्रिलला पेंटिंगचे काम करीत असताना वॉशिंग साईडींगची स्लॅब कोसळून त्याखाली दबल्यामुळे सुभाषचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे संघटनांनी कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी या प्रकरणाची चौकशी करीत कारवाईचे आदेश दिले होते. अखेर पोलीस हवालदार तेजराम वाघमारे (४०) यांच्या तक्रारीवरून इतवारी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहेत.
‘त्या’ मृत्यूबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST
इतवारी रेल्वेस्थानकावर १४ एप्रिलला नवनिर्मित वॉशिंग साईडच्या लाईनची स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेत इतवारी लोहमार्ग पोलिसांनी संबंधित कंत्राटदारासह सुपरवायजारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
‘त्या’ मृत्यूबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देइतवारी रेल्वेस्थानकावर कामगाराचा मृत्यू