शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकाराचा मृत्यू पण ‘शो मस्ट गो आॅन’

By admin | Updated: October 2, 2014 01:07 IST

त्यांनी चित्रातून आयुष्याचा संघर्ष मांडला, अनेक सामाजिक विषयांना हात घालून संवेदनशील मनांना साद घातली, कधी निसर्गाच्या विविध रूपांनी त्यांना खुणावले तर कधी स्त्रीच्या अव्यक्त भावनाही त्यांनी

प्रसिद्ध चित्रकार नितीन राळे यांचे निधन नागपूर : त्यांनी चित्रातून आयुष्याचा संघर्ष मांडला, अनेक सामाजिक विषयांना हात घालून संवेदनशील मनांना साद घातली, कधी निसर्गाच्या विविध रूपांनी त्यांना खुणावले तर कधी स्त्रीच्या अव्यक्त भावनाही त्यांनी चित्रातून सूक्ष्मतेने अभिव्यक्त केल्या, त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला. हे प्रदर्शन सुरूच आहे. दोन वळूंचे भांडण होत असतानाचे एक चित्र त्यांनी रेखाटले आहे. यात कोण जिंकणार, ते काहीच सांगता येत नाही. पण एका संवेदनशील चित्रकाराच्या श्वासांवर नियतीने त्यांच्या ५२ व्या वर्षीच डाव जिंकला. प्रसिद्ध चित्रकार नितीन राळे यांचे बुधवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण स्वत:चे दु:ख लपवून रसिकांना कलाकृतीचा आनंद देणाऱ्या कलावंतांच्या आयुष्यात ‘शो मस्ट गो आॅन’ असतोच. यस्स...त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे. नितीन राळे बाबानानक सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक होते. शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू असतानाच त्यांना हृदयाचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले. चित्रकार राळे यांनी लोट्स बुद्धा या संकल्पनेवरील बुद्धाचे चित्र प्रसिद्ध केले. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जयकुमार जांभुळकर, अरविंद गजभिये, पुरुषोत्तम लिखार, अनिता धानी आणि राळे यांनी मिळून हा ग्रुप शो केला. या प्रदर्शनाला मिळालेल्या यशाने ते आनंदी होते. काल रात्री त्यांच्याशी दर्डा आर्ट गॅलरीत चित्रांवर मनमोकळी चर्चा झाली आणि आज त्यांच्या निधनाची बातमी आली. पण ते आमच्यासोबतच असल्यासारखे वाटते, असे यावेळी सर्व चित्रकारांनी सांगितले. नितीन राळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. (प्रतिनिधी)