शेतकऱ्यांच्या समर्थनात मनपा कर्मचाऱ्यांचे धरणे()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:07+5:302020-12-04T04:24:07+5:30
नागपूर: राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशन (इंटक) व नागपूर जिल्हा इंटकच्या वतीने शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपास पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या न्याय्य ...

शेतकऱ्यांच्या समर्थनात मनपा कर्मचाऱ्यांचे धरणे()
नागपूर: राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशन (इंटक) व नागपूर जिल्हा इंटकच्या वतीने शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपास पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या केेंद्र शासनाने त्वरित मान्य कराव्या, यासाठी संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालय परिसरातील संघटनेच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले
संघटनेचे अध्यक्ष तथा इंटकचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांचे अध्यक्षतेत आंदोलन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, ईश्वर मेश्राम, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, अभय अप्पनवार, बळीराम शेंडे, पुरुषोत्तम कैकाडे, मारोती नासरे, अरुण तुर्केल, सुषमा नायडू, संजय गाटकिने ,दत्तात्रय डहाके ,कुणाल यादव, कुणाल मोटघरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.