शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

धरणे कोरडी,नागपूर जिल्ह्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:49 IST

मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणी साठामे महिन्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला केवळ २८३ दलघमी(८ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ १५ दलघमी म्हणजे २ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३८ दलघमी (२७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोवर नांद १ टक्के, वडगाव प्रकल्पात १९ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २० टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २१ टक्के, कालिसरार ५० टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ८ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३२ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये १ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ६ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द व दिना रिकामेभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना हे दोनही प्रकल्प पूर्णपणे रिकामे आहेत. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा क्षमता ७४० दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला पाणीच नाही. तर दिना प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ६८ दलघमी इतकी असून ते सुद्धा रिकामेच आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारची धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात २ एप्रिल रोजीपर्यंत केवळ ८० दलघमी म्हणजेच १५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ६१ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पाच वर्षात सर्वात कमी साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता मागील पाच वर्षात यंदा सर्वात कमी पाणीसाठा आबहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी २०१८ मध्ये २ मे रोजी मोठ्या धरणांमध्ये ८९४ दलघमी इतका साठा होता. २०१७ मध्ये याच तारखेला ५०५ दलघमी इतका पाणीसाठा होता. २०१६ मध्ये ८७२, २०१५ मध्ये ९३० आणि २०१४ मध्ये १६२० दलघमी इतका साठा होता. आणि यंदा केवळ २८३ दलघमी इतका साठा आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी परिस्थिती भयावह झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण