दाल मिल फोडली, १.१९ लाखांची तुरदाळ चोरली
By दयानंद पाईकराव | Updated: May 25, 2024 17:20 IST2024-05-25T17:20:23+5:302024-05-25T17:20:52+5:30
तीन आरोपी गजाआड : कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घटना

Dal mill broken, Turdal worth 1.19 lakhs stolen
नागपूर : दाल मिल फोडून १.१९ लाख रुपये किमतीची ७०० किलो तुरदाळ चोरी करणाऱ्या तीन आरोपींना कळमना पोलिसांनी गजाआड केले आहे.
भागवत उर्फ गुड्डु मून्ना राय (३२, रा. घरसंसार ले-आउट, पारडी), दामु रामलखन खेलवार (२९) आणि रामलखन रामसखा खेलवार (४५) दोघे रा. प्लॉट नं. 76, पुनापूर, भवानी मंदीर रोड, पारडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुकेश माऊजीभाई शाह (४२, रा. प्रशांत शाळेसमोर, हिवरी ले आऊट) यांचे कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंस्टंडन एरिया भरतनगर येथे तुरदाळ मिल आहे. मुकेश शाह १८ मे रोजी रात्री ८.३० वाजता आपली दाल मिल बंद करून घरी गेले होते. १९ मे रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांना आपली दाळ मिल फोडून चोरटयांनी १ लाख १९ हजार रुपये किमतीची ७०० किलो तुरदाळ चोरी केल्याचे समजले.
त्यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन, सहायक पोलिस निरीक्षक उज्वल इंगोले आदींनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून तीन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी तुरदाळ चोरीची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ६२ हजार ५० रुपये किमतीची ३६५ किलो तुरदाळ, गुन्ह्यात वापरलेला अशोक ले लँड टु प्लस क्रमांक एम. एच. ४९, बी. झेड-०११६ असा एकुण ७ लाख ६२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.