शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांना रोज ५३० रेमडेसिवीरचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:26 IST

सुमेध वाघमारे नागपूर : ‘डब्ल्यूएचओ’ व ‘आयसीएमआर’ने रेमडेसिवीर परिणामकारक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसाच्या ...

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘डब्ल्यूएचओ’ व ‘आयसीएमआर’ने रेमडेसिवीर परिणामकारक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांना पहिल्या पाच दिवसाच्या आत रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे आजही नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना रोज जवळपास ५३० वर रेमडेसिवीरचा डोज दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनचा ७५७७ साठा उपलब्ध आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचा संसर्गाचा दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात हे औषध परिणामकारक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नेही (आयसीएमआर) या इंजेक्शनच्या जास्त वापराने आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु कोरोनावर खात्रीलायक अद्यापही उपचार नाहीत. रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याचा अनुभव डॉक्टरांच्या पाठिशी आहे. यामुळे याचा वापर होत आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ५७७४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील १४४९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचाराखाली आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना रेमडेसिवीरचा डोज दिला जात असल्याची माहिती आहे.

-सप्टेंबर महिन्यात रोज लागत होते २२०० इंजेक्शन

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली. ‘एफडीए’नुसार एकट्या सप्टेंबर महिन्यात रोज जवळपास २२०० ते २३०० इंजेक्शनचा वापर होत होता. सध्या हे प्रमाण कमी झाले असून ५३० वर आले आहे.

-इंजेक्शनवर रोज १२ लाखांचा खर्च

ऑगस्ट महिन्यात रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने तुटवडा पडून काळाजबाजारही वाढला होता. परंतु शासनाने ठाराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने आणि ‘एफडीए’नेही इंजेक्शनची मागणी व साठा यावर लक्ष ठेवल्याने यावर नियंत्रण मिळविण्यास यश आले. सध्याच्या स्थितीत या इंजेक्शनवर रोज साधारण १२ लाखांचा खर्च होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-रेमडेसिवीरचा आवश्यक साठा उपलब्ध

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी कमी झाली आहे. सध्या रोज जवळपास ५३० इंजेक्शनचा वापर होत आहे. नागपूर जिल्ह्यासाठी ७५७७ इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याने तूर्तास तरी तुटवडा नाही.

-महेश गडेकर

सहआयुक्त, एफडीए