नागपुरात जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:03 IST2019-11-11T21:01:51+5:302019-11-11T21:03:27+5:30
शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नागपुरात जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी लवकरच दहनघाट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करता भांडेवाडी येथे जनावरांचा दहनघाट निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
जानेवारी २०१६ मध्ये जनावरांच्या दहन घाटाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. महापालिका आयुक्तांनी याला हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. २०१७ मध्ये राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाचा सर्वदृष्टीने विचार करण्यात आला. तांत्रिक सल्लागाराच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे. पुढील काही दिवसात याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहे. निविदा मंजुरीनंतर कं त्राटदाराला भांडेवाडी येथे दहनघाट निर्माण करण्याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात जनावरांचा अत्याधुनिक दहनघाट उभारण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. भांडेवाडी येथे १८०० चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विजेवर चालणाºया इन्सिनिरेटर मशीनवर ३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पर्यावरण पूरक दहन घाटाचे निर्माण झाल्यानंतर मृत जनावरांना भांडेवाडी येथे जमिनीत पुरले जाणार नाही. मशीनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातील.
नागपूर शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरतात. यात काही पाळीव जनावरांचाही समावेश आहे. मृत जनावरांना भांडेवाडी येथे आणून त्याला जमिनीत पुरले जात होते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे मरण पावल्यास गोपलकांना पावसात खड्डा खोदून त्यावर अंतिम संस्कार करावे लागत होते. परंतु आता ही समस्या मिटणार आहे.
भांडेवाडी येथे जागा शिल्लक नाही
शहरात दररोज ४० ते ४५ जनावरे मरण पावतात.जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी भांडेवाडी येथे दररोज खड्डे खोदावे लागतात. त्यामुळे आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. पावसाळयाच्या दिवसात जनावरांवर अंतिम संस्कार करताना खड्डा खोदण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. तसेच आता येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. भविष्याचा विचार करता जनावरांचा दहनघाट होणे ही काळाची गरज आहे.