धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात

By कमलेश वानखेडे | Updated: February 5, 2025 17:06 IST2025-02-05T17:05:32+5:302025-02-05T17:06:08+5:30

- माझ्या खात्यातील सर्व व्यवहार डीबीटीच्या धोरणानुसारच, - नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील

dada bhuse reaction over on the allegations against dhananjay munde | धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात

कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर - कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी डीबीटी धोरण गुंडाळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. मात्र, माजी कृषीमंत्री व विद्यमान शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांंनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, असे सांगत कानावर हात ठेवले. डीबीटीच्या धोरणानुसारच माझ्या खात्यातील सर्व व्यवहार होत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी नागपुरात दाखल होत शिक्षण विभागाचा आढावा घेतला. कळमेश्वर नगर पालिका, जिल्हा परिषद उबाळी शाळा आणि नागपूर मनपच्या हिंदी शाळेला त्यांनी भेट दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदाच्या वादावर ते म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पक्षाला तालुका जिल्हा, या पक्ष वाढवण्याच अधिकार आहे, उत्तर दायित्व जनतेशी आहे, जनतेचे प्रश्न सुटत असेल तर दावा असणे सोडणे हा विषय नाही. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. संजय राऊत जे बोलले त्यांना ठाण्याचा रुग्णालयात दाडी वाल्या(शिंदे) डॉक्टरला दाखवावे लागेल. दररोज काहीतरी विचित्र बोलतात आणि विषय चर्चेसाठी देण्याच काम ते करतात. त्यांना गांभीऱ्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

कुठे जावे हा भूजबळांचा अधिकार

- लोकशाहीत कुणी कुठे रहावे, जावे हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. छगन भूजबळ यांनाही तो अधिकार आहे. कोणाला प्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा अधिकार आहे, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
काही ठिकाणी शाळा बंद होत आहेत

- राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवताना, काही ठिकाणी शाळा बंद होत आहेत इंग्रजी माध्यमांशी स्पर्धा करताना शाळा, विद्यार्थी टिकले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर काम काज सुरू आहे. शिक्षक संघटनाशी या संदर्भात विचारमंथन झाले. विभागवार आढावा बैठक झाली. आणखी काय करण्याची गरज आहे याचा आढावा घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

- अंशत: अनुदानाबाबत शासन निर्णय झाला आहे. निधी उपलब्ध होऊ शकला नाही. बजेटमध्ये मागणी करू. शिक्षक नियुक्तीबाबत ज्यांची परीक्षा झाली त्यांना नियुक्त करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: dada bhuse reaction over on the allegations against dhananjay munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.