डी. के. पाटील भुजबळ नागपुरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक, सोमवारी आदेश जारी

By योगेश पांडे | Updated: July 9, 2024 00:22 IST2024-07-09T00:22:02+5:302024-07-09T00:22:16+5:30

गृह विभागाने एकूण १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

D. K. Patil Bhujbal new Special Inspector General of Police, Nagpur, order issued on Monday | डी. के. पाटील भुजबळ नागपुरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक, सोमवारी आदेश जारी

डी. के. पाटील भुजबळ नागपुरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक, सोमवारी आदेश जारी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य गुन्हे अभिलेख विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डी.के.पाटील भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात आदेश जारी केले.

दोरजे यांची कायदा व सुव्यवस्था विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. ते मुंबईत जबाबदारी स्वीकारतील. सुहास वारके यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त झाले होते. तर नागपुरच्या पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांची नागरी हक्क संरक्षणच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबईत बदली झाली आहे. गृह विभागाने एकूण १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबई, पुणे व नागपुरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

Web Title: D. K. Patil Bhujbal new Special Inspector General of Police, Nagpur, order issued on Monday