भरधाव दुचाकीची धडक, सायकलस्वाराचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: July 13, 2024 16:45 IST2024-07-13T16:44:40+5:302024-07-13T16:45:21+5:30
Nagpur : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने दिली धडक

Cyclist killed in collision with speeding bike
नागपूर : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने धडक दिल्यामुळे सायकलवर आपल्या घराकडे जात असलेल्या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे.
सुनिल रामाजी वासनिक (४५, रा. आंबेडकरनगर, चंद्रमणी चौक, वाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सोमवारी ८ जुलैला सायंकाळी ७.३० वाजता कामावरून सायकलने घराकडे जात होते. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून सुनिल यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. सुनील यांना वाडी येथील खासगी हॉस्पीटलमध्ये व तेथून सोमवारी क्वार्टर येथील कामगार रुग्णालयात व नंतर कामठी येथील खासगी रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १० जुलैला रात्री १०.१० वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी सनी लेखाराज वाघमारे (३५, रा. आंबेडकरनगर, राहुल चौक, वाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, २८१ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.