नागपूरनजीकच्या बोखारा येथे पत्नीची गळा कापून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:26 IST2019-07-16T22:25:08+5:302019-07-16T22:26:14+5:30

पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

Cutting wife's throat and killing at Nagpur's Bokhara | नागपूरनजीकच्या बोखारा येथे पत्नीची गळा कापून हत्या

नागपूरनजीकच्या बोखारा येथे पत्नीची गळा कापून हत्या

ठळक मुद्देआरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कोराडी ) : पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
अनिता दिलीप खापेकर (४०) असे मृत पत्नीचे नाव असून, दिलीप खापेकर (४५) असे आरोपी पतीचे नाव आहे. ते शंकर मंदिर, रेल्वे गेट, पाचपावली, नागपूर येथील रहिवासी आहेत. दोघेही बोखारा येथील स्मृतीनगर परिसरातील नाल्याजवळ आले होते. तिथे दिलीपने अनिताचा शस्त्राने गळा कापून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला विषारी औषध पाजले. ती गतप्राण होताच त्यानेही विषारी औषध प्राशन केले.
दोघेही नाल्याच्या परिसरात पडून असल्याचे दिसताच नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत अनिताचा मृत्यू झाला होता. शिवाय, दिलीप अत्यवस्थ होता. त्यामुळे पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर दिलीपला उपचारासाठी तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविले. सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
दिलीपने आधी पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दोघेही कौटुंबिक कारणामुळे तणावात असावे. त्यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दिलीप अत्यवस्थ असल्याने त्याच्याकडूनही माहिती मिळू शकली नाही, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Cutting wife's throat and killing at Nagpur's Bokhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.