शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना हवा भारतीय मोबाईल व लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:27 IST

चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

ठळक मुद्देचिनी माल नकोच : भारतासह इतर देशांच्या वस्तूंना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वर्क फॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉप, टॅब या वस्तूंना मागणी वाढली आहे. या वस्तूंचा तुटवडा असला तरी भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. सध्या लॅपटॉप आणि मोबाईलची विक्री पूर्वीपेक्षा दुप्पट, तिप्पट झाली आहे.भारतीयांनी चीनवर बहिष्काराचे अस्त्र उभारले जात आहे. चीनला धडा शिकविण्याच्या उद्देशाने प्रत्येक भारतीय आणि व्यापारी चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन करीत आहेत. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण चीनच्या वस्तू नाकारत असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे.बाजारात चीनच्या विविध कंपन्यांसह भारतीय व इतर देशांमधील कंपन्यांचे मोबाईल लॅपटॉप, टॅब, संगणक व इतर पूरक साधने उपलब्ध आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक चिनी वस्तूंना नाकारत भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती देत आहेत. या वस्तू उपलब्ध नसल्यास चिनी वगळून इतर देशांच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भारतीय वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच चिनी लॅपटॉप आणि मोबाईलची विक्री होत आहे. बाजारपेठेत चिनी वस्तूंचे वर्चस्व कमी करण्यासाठी व्यापारी आणि विविध संघटना प्रयत्न करीत आहेत. विशेषत: घरगुती उपकरणांमध्येही भारतीय बनावटीच्या वस्तूंचा शोध ग्राहकांकडून घेतला जात आहे.कंपनी न बघता लोक करताहेत खरेदीसध्या वर्क फॉम होम आणि ऑनलाईन शैक्षणिक प्रणालीमुळे लॅपटॉप, संगणक, वेबकॅम व टॅबला मागणी वाढली असून तीनपट विक्री होत आहे. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. लोक गरजेपोटी कंपनी न पाहता या वस्तूंची खरेदी करीत आहेत. व्यावसायिकांना संधी उपलब्ध झाली आहे.दिनेश नायडू, उपाध्यक्ष, विदर्भ कॉम्प्युटर मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन.दहापैकी नऊ बॅ्रण्ड चीनचेलॅपटॉपचे भारतीय ब्रॅण्ड तयार होण्यास पाच वर्षे लागतील. बाजारात दहापैकी नऊ ब्रॅण्ड चीनचे आहे. सध्या विक्री वाढली असून भारतीय ब्रॅण्ड उपलब्ध नसल्याने ग्राहक उपलब्ध ब्रॅण्ड खरेदी करीत आहेत. त्यांच्यासमोर पर्याय नाही. लोक चिनी उत्पादने नको असे म्हणत आहेत, पण त्यांच्यासमोर चिनी लॅपटॉपशिवाय पर्याय नाही.ललित गांधी, सचिव, विदर्भ कॉम्प्युटर मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन.मोबाईलची दिवाळीपेक्षा जास्त विक्रीविवो मोबाईल मेड इन इंडिया असल्याने लोकांची जास्त मागणी आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांकडून मागणी वाढल्याने दिवाळीपेक्षा दुप्पट, तिप्पट मागणी आहे. विक्री पुढील महिन्यात सामान्य होईल. बाजारपेठेत चिनी इफेक्ट दिसत आहे.सूरजसिंग सावजी, विवो मोबाईल डीलर (नागपूर ग्रामीण)

टॅग्स :IndiaभारतlaptopलॅपटॉपMobileमोबाइल