शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सिलिंडर चोरीचा गुन्हेगार झाला नागपूरचा डॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:54 PM

एकेकाळी सिलिंडर चोरून आपला उदरनिर्वाह करणारा संतोष आंबेकर पोलीस, कायदा आणि माध्यमांचा वापर करून शहरातील गुन्हेगारांचा डॉन झाला आहे.

ठळक मुद्देआंबेकरचे अनेक शहरात जाळे : नेते, पोलिसांवर ठेवला वचक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी सिलिंडर चोरून आपला उदरनिर्वाह करणारा संतोष आंबेकर पोलीस, कायदा आणि माध्यमांचा वापर करून शहरातील गुन्हेगारांचा डॉन झाला आहे. १५ दिवसांपासून आंबेकर टोळीची पाळेमुळे खोदण्याच्या कामाला लागलेल्या पोलिसांना तपासात याचा खुलासा झाला आहे.आंबेकरला गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटीने फसवणूक आणि एक कोटीच्या वसुली प्रकरणात १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आंबेकर टोळीविरुद्ध तीन गुन्हे शहर आणि ग्रामीण पोलिसात दाखल झाले. पोलिसांनी आंबेकरसह आठ आरोपींना अटक केली. ते मकोका प्रकरणात १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत आंबेकरपासून लक्झरी कारसह साडेसहा कोटींची संपत्ती जप्त केली आहे. आंबेकरच्या घरातील कागदपत्रांवरून त्याच्याकडे २५ कोटीची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. दोन दशकांपूर्वी आंबेकरला इतवारीत कुणीही ओळखत नव्हते. त्याने सिलिंडर चोरी करून गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले होते. त्यावेळी ग्राहक सायकलवर सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीत जात होते. आंबेकर सायकलसह सिलिंडर घेऊन फरार होत होता. त्यावेळी इतवारी सराफा बाजार आंबेकरच्या गुन्ह्याचे स्थळ होते. सराफा व्यापाऱ्यांची नस पकडण्यासाठी आंबेकरने सराफा बाजाराच्या फूटपाथवर दागिने पॉलिश करणे सुरू केले. त्याने सराफा व्यापाऱ्यांकडून हप्ता वसुली सुरू केली. सराफा बाजारात अनिल निनावेची दहशत होती. आंबेकरने १९९९ मध्ये निनावेचा खून केला. निनावेच्या खुनात डझनभरापेक्षा अधिक आरोपींचा समावेश होता. आंबेकरने तडजोड केल्यामुळे ते बचावले. खुनाच्या पहिल्याच प्रकरणात आंबेकर निर्दोष सुटला. त्यानंतर त्याची दहशत निर्माण झाली. त्याने हप्ता वसुली, ब्लॅकमेल करणे, जमीन ताब्यात घेणे सुरू केले. अडथळा आणणाऱ्यांना सुपारी देऊन हटविले. यात बिल्डर अनंता सोनी, गुन्हेगार भवानी सोनी, बाल्या गावंडेचा समावेश आहे. नोव्हेंबर २०११ च्या सुभाष साहूच्या खूनप्रकरणात त्याची भूमिका महत्त्वाची होती. परंतु पोलिसांनी ठोस पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून दिले. सुभाषच्या खुनानंतर आंबेकरने संपत्ती बळकावणे, फसवणूक करणे सुरू केले. एका संपत्तीच्या वादात धमकी दिल्यामुळे त्याने बाल्या गावंडेचा खून केला होता. आंबेकरजवळ वादातीत संपत्तीचा सौदा करणे, बळकावण्यासाठी १५ ते २० जणांची टोळी आहे. आंबेकरने या मार्गाने इतवारीत १५ पेक्षा अधिक संपत्ती बळकावल्या. त्याने नागपूरशिवाय मुंबई, गोव्यात बनावट नावाने संपत्ती खरेदी केली. काही नागरिकांची ओळख झाली असून, त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई होऊ शकते.आंबेकरची दहशत बनविण्यात आणि आर्थिक साम्राज्य वाढविण्यात नेता, पोलीस आणि कायद्यातील जाणकारांची महत्त्वाची भूमिका आहे. ३० पेक्षा अधिक प्रकरणे तसेच चार मकोका कारवायानंतरही तो अधिक काळ तुरुंगात राहिला नाही. दोन मकोकात तो निर्दोष सुटला. एका कारवाईत आश्चर्यकारकपणे त्याने मुंबईत मंत्रालयातून दिलासा मिळविला तर एक प्रकरण न्यायालयात सुरु आहे. तो पीडित व्यक्तीला सोशल मीडियावर आपले स्टेटस दाखवून भयभीत करीत होता. त्याने सोशल मीडियासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. तो नेहमीच नेत्यांच्या संपर्कात राहत होता. पोलीस तपासात त्याचे पुरावे आढळले आहेत. जाणकारांच्या मते मदत करणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय आंबेकरचा सफाया केल्या जाऊ शकत नाही.अनेक संपत्तीत भागीदारीआंबेकर अनेक वर्षांपासून संपत्ती तसेच गुन्हेगारी जगतात न्याय निवाडा करीत होता. शहरातील अनेक मोठ्या संपत्तीच्या खरेदी-विक्रीत त्याची महत्त्वाची भूमिका होती. जानेवारी २०११ मध्ये अनंता सोनी खून संपत्तीच्या वादातून झाला होता. आंबेकरने अनंताला घरी बोलावून धमकी दिली होती. कळमना पोलीस आरोपीचा शोध घेऊ न शकल्याने तपास सीआयडीकडे देण्यात आला. सीआयडीलाही खुनातील आरोपी मिळाले नाहीत.बंगला करणार जमीनदोस्तपोलीस आंबेकरचा इतवारी येथील बंगला जमीनदोस्त करणार आहेत. या संदर्भात महापालिका आणि नासुप्रशी संपर्क साधण्यात येणार आहे. आंबेकरने चार व्यक्तींकडून जमीन खरेदी करून हा बंगला तयार केला आहे. विना परवानगी बांधकाम केले. त्याच्यावर कारवाई न करणे हे ही गुन्हेगाराची मदत करणे आहे. त्यामुळे त्याचा बंगला पाडण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर