मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:09 IST2025-09-17T14:09:01+5:302025-09-17T14:09:33+5:30

तब्बल १.०८ कोटी रुपयांचा खर्च : देवगिरी'सह रवि भवनातील तीन व नाग भवनातील चार कॉटेजची दुरुस्ती

Crores wasted on renovation of ministers' bungalows? Contractor takes on 21 percent 'bill' work, reveals details | मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस

Crores wasted on renovation of ministers' bungalows? Contractor takes on 21 percent 'bill' work, reveals details

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महागाईच्या काळात ४० ते ५० लाख रुपयांत चांगले घर उभारले जाऊ शकते; पण मंत्रिमहोदयांचे निवासस्थान असल्यास खर्चदेखील मंत्रिपदासारखाच मोठा असतो, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारातून स्पष्ट होते. रविभवन परिसरातील उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी' बंगल्यासह इतर दोन बंगले तसेच नाग भवनातील चार बंगल्यांच्या छतांच्या दुरुस्तीसाठी विभागाने तब्बल १ कोटी ८ लाख २६ हजार ३९८ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

या टेंडरवरून आता वाद निर्माण झाला आहे. 'देवगिरी'च्या कामासाठी मंगळवारी टेंडर उघडण्यात आले. यामध्ये एका ठेकेदाराने 'देवगिरी'चे छत बदलण्याचे काम २१ टक्के कमी दराने (बिलो) घेऊन, अधिकाऱ्यांच्या अंदाजपत्रकावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यातूनच हे ठेके व अंदाजपत्रके किती वस्तुनिष्ठ आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित बंगल्यांचे टेंडर बुधवारी उघडले जाण्याची शक्यता आहे. 

कळीचे मुद्दे

  • हिवाळी अधिवेशनात, रविभवन येथील ३० कॉटेज कॅबिनेट मंत्र्यांना आणि नाग भवन येथील १६ कॉटेज राज्य मंत्र्यांना वाटप केले जातात.
  • ९ मे रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांना वाटप करण्यात आलेल्या रविभवनमधील कॉटेज क्रमांक १३ ची छत कोसळली होती.
  • छत उघडून तपासणी केल्यावर पीओपी चांगल्या स्थितीत आढळली. मात्र त्याच्या वरचा लाकडी सांगाडा (ट्रस) उदळीमुळे खराब झालेला आढळला.
  • १४.१६ लाख रुपये शुल्क न भरल्यामुळे बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्यास खूपच उशीर झाला.

 

इतरही कामे केली जाणार

पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत आहेत. टेंडरनुसार छत बदलण्याबरोबरच बंगल्यांचे नूतनीकरणदेखील करण्यात येणार आहे. कारण विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे, त्यामुळे उर्वरित बंगल्यांचे काम त्यानंतर केले जाईल. सरकारच्या 'कॉस्ट डाटा'नुसारच टेंडरचे दर निश्चित करण्यात आले आहेत, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.

व्हीएनआयटीने दिला होता छत बदलण्याचा सल्ला

पीडब्ल्यूडीच्या विनंतीवरून व्हीएनआयटीने रविभवन आणि नाग भवनमधील बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यांच्या प्राथमिक अहवालात छतांची स्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत तात्काळ बदल करण्याची शिफारस करण्यात आली. अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असताना, विभागाने तातडीने हालचाली करत टेंडर प्रक्रिया सुरू केली.

'देवगिरी' सह तीन बंगले पहिल्या टप्प्यात

पहिल्या टप्प्यात रविभवनमधील उपमुख्यमंत्री शिंदे यांचा 'देवगिरी', विधानसभा अध्यक्षांचा बंगला क्र. ९, तसेच विधानपरिषद सभापतींचा बंगला क्र. १८ यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नाग भवनमधील चार कॉटेजचे कामही प्रस्तावित आहे. नाग भवनमधील एका बंगल्यावर ६० लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.

Web Title: Crores wasted on renovation of ministers' bungalows? Contractor takes on 21 percent 'bill' work, reveals details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.